वृत्तसेवा
रिसोड :- येथील न्यायालयीन कर्मचारी सुरज शामराव जोगदंड (३०) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ७ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार. तालुक्यातील निजामपुर फाटा येथील सुरज जोगदंड हे रिसोड येथील न्यायालयात मागील चार ते पाच वर्षापासुन कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. दरम्यान, सुरज जोगदंड यांची पत्नी मुलासह माहेरी गेलेली होती. त्यामुळे घरात कोणीच नसल्याने त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी महादेव चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणी हलवून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. या कर्मचाऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अजूनही अनुत्तरीत आहे. पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव चव्हाण करीत आहेत.