मलकापूर:शहरातील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीने मुलाच्या आयुष्याचे नुकसान झाले अशी तक्रार पीडित माता पुनम भारंबे यांनी गेल्या काळात केली होती. या पिढीत मातेच्या तक्रारीवरून तीन सदस्य समिती डॉक्टर चोपडेविरुद्ध गठीत करण्यात आली होती. आज दिनांक 26 जून रोजी मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे चौकशी करण्यासाठी समिती आली असता समितीतील सदस्यांची चुकीची वागणूक व चौकशीची चुकीची पद्धत पाहून पीडित मातेने सदर समितीला विरोध दर्शवण्यासाठी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.
याबाबत सविस्तर असे की डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांच्याविरुद्ध चौकशीसाठी नेमलेल्या तीन सदस्य समितीत डॉ घोंगटे, डॉ पोळ, डॉ उंबरकर यांचा समावेश आहे.समितीकडून चौकशीसाठी पीडित माता पुनम भारंबे, पीडित मुलगा दुर्गेश भारंबे व ब्रहानपूर येथील डॉक्टर सुबोध बोरले यासह आरोप केल्या गेलेले डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांना चौकशीसाठी समितीकडून बोलवण्यात आले होते. मात्र डॉक्टर राहुल रमेश चोपडे चौकशी समिती समोर दिसून आले नाही. तरीसुद्धा चौकशी समितीकडून चौकशी सुरू झाली.
दरम्यान चौकशी समितीने पीडित मुलगा दुर्गेश याला एका बंद खोलीत नेऊन दार बंद केले. दुर्गेश व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश देण्यास समितीने नकार दिला होता. त्यामुळे पीडित मातेने समितीला विनंती केली की,”मी मुलाची आई आहे.तो आधीच घाबरलेला आहे. मला मुलाजवळ येऊ द्या!” तरीसुद्धा समितीने काहीही एक ऐकले नाही. त्यामुळे पीडित मातेने संतापून समितीला व समितीच्या चौकशीला विरोध केला. नुसता विरोधच नव्हे तर काळे झेंडे दाखवून समितीचा निषेध पीडित मातेने व्यक्त केला.
बंद खोलीत पीडित दुर्गेश सोबत घडले तरी काय?
गोपनीयतेच्या नावाखाली चौकशी समिती सदस्यांनी पीडित दुर्गेश भारंबे याला दार बंद केले. आईने आक्रोश केला व कशीबशी आत शिरली तेव्हा पीडित मुलाने सांगितले की, त्याला जोर जबरदस्तीने चालण्यासाठी धाकधपटशहा करण्यात आले. पायाला सुया ही टोचण्यात आल्या. एवढेच काय तर मुलाच्या पायाची पट्टी सुद्धा काढण्याचा प्रयत्न झाला. बॉईल ड्रेसिंग ची व्यवस्था नसताना अशा बेजबाबदार पद्धतीने मुलाच्या पायाची पट्टी काढली असती तर इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता होती. एकंदरीत चौकशी समितीकडून गोपनीयतेच्या नावाखाली धाकदपट शहा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
आरोप असलेले डॉक्टर राहुल रमेश चोपडे चौकशी दरम्यान अनुपस्थित
चौकशी समितीकडून चौकशीसाठी आरोप असलेले डॉक्टर राहुल रमेश चोपडे चौकशी दरम्यान दिसून आले नाही. म्हणजे ज्यांच्यावर आरोपाचा ठपका आहे तेच चौकशी समोर हजर नसताना चौकशी होते तरी कशी?असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. याउलट ज्या डॉक्टरांनी मुलाचा जीव वाचवला असे डॉक्टर सुबोध बोरले हे ब्रहानपूर वरून मलकापूर येथे कर्तव्यासाठी येतात मात्र शहरातल्या शहरातच चौकशी समिती समोर डॉक्टर राहुल रमेश चोपडे हजर राहू शकले नाही.विशेष म्हणजे डॉ चोपडे यांचे साठे नामक हेर या परिसरात दिसून आले.
चौकशी समितीतील सदस्य डॉ.संतोष पोळ वादाच्या भोवऱ्यात
पीडित मातेचा ने आरोप केला आहे की डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांच्या विरुद्ध गठीत समितीतील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर संतोष पोळ यांचे व डॉक्टर चोपडे यांचे मैत्रीपूर्ण व सलोख्याचे संबंध आहे शिवाय गेल्या दिवसात डॉक्टर संतोष पोळ यांचा डॉक्टर चोपडे यांच्याकडे मुक्काम राहिला आहे. त्यामुळे अशा वादग्रस्त डॉक्टरांकडून मला निपक्ष व पारदर्शक न्याय मिळण्याची शक्यता नाही.शिवाय पीडित माता व मुलाला पाहून संतोष पोळ मिस्कील पणाने हसत असून खिल्ली उडत असल्याचाही आरोप यावेळी मातेने केला आहे याच कारणाने चौकशी समितीला काळे झेंडे दाखवून पीडित मातेने निषेध नोंदवला आहे.
चौकशी निःपक्ष व पारदर्शकतेसाठी बंद खोली नव्हे तर; ऑन कॅमेरा व्हायला हवी
गोपनीयतेच्या नावाखाली चौकशी समितीकडून पीडित मुलाच्या आई-वडिलांनाही प्रवेश देण्यास नकार दिला.वस्तुतः चौकशी पारदर्शक व निपक्ष होण्यासाठी बंद खोलीची नव्हे तर ऑन कॅमेरा चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशी समितीने गोपनीयता ठेवण्याचे आदेश असल्याबाबत सांगून मनमानी कारभार केला आहे. वस्तुतः चौकशी ही उघडपणे व निसंदिग्धपणे व्हायला हवी होती. राहिला गोपनीयतेचा प्रश्न तर अहवाला हा गोपनीय असू शकतो.