Headlines

धरणगाव खून प्रकरणात पोलिसांनी 3 तासात लावला आरोपीचा शोध, दारू पिण्याच्या वादातून घडला हत्याकांड, आणखी दोन संशयीतांची चौकशी सुरू..

मलकापूर :- तालुक्यातील धरणगांव येथे काठीने जबर मारहाण करून २१ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली असल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मृतक हा मोताळा तालुक्यातील डिडोळ्या येथील रहिवासी असून पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होतो या हत्येचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. या घटनेतील एक आरोपी निष्पन्न झाला असून दोन संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की , आज शुक्रवारी सकाळी ५ ३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मौजे धरणगांव येथील काही जण शौचास जात असतांना गावातील खंडोबा मंदिरानजीक असलेल्या सार्वजनिक ओपन सभागृहात त्यांना रक्ताचा सडा आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलीस पाटलांच्या माध्यमातून शहर पोलिसांना माहिती दिली.
त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांच्या पथकासह सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक करुणाशिल तायडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल वरारकर,यांच्यासह पोलीस कर्मचारी ना.पो.कॉ शाम कपले, पोलीस अंमलदार आसिफ शेख, ईश्वर वाघ, प्रमोद राठोड, प्रवीण गवई, संतोष कुमावत, गोपाल इंगळे, मंगेश चरखे, अशोक सुरळकर, नवल राठोड, निलेश तायडे, सचिन पवार, गोपाल खंडारे आदींसह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना खंडोबा मंदिरानजीकच्या ओपन सभागृहात रक्ताचा सडा व बाजूला युवकाचा मृतदेह आढळून आला. मृतकाच्या खिशातील मोबाईलवर संपर्क करण्यात आल्याने त्याची ओळख पटली. मृतकाचे नाव दिपक सुधाकर सोनोने वय २१ रा . डिडोळा ता . मोताळा असे आहे. या घटनेत मृतकावर काठीने जबर मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर खंडोबा मंदिरानजीकच्या ओपन सभागृहात तब्बल ३० फूट मारेकऱ्यांनी मृतदेह फरफटत नेल्याने रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले आहे.
या घटनेने धरणगांवात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीन तासाच्या आत 3 संशयित आरोपी ताब्यात घेऊन त्यातील 1 आरोपी अनिल राजाराम इंगळे वय 45 रा.धरणगाव याला निष्पन्न केले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बुलढाणा येथील श्वान पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. सदर कारवाई ही बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासने व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून आरोपी त्यांच्याविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपास सहाययक पोलीस उपनिरीक्षक करुणाशील तायडे करीत असून सदर घटना ही दारू पिण्याच्या वादातून झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!