जळगाव : प्रेमाच्या जाळ्यात ओढत व लग्नाचे आमिष दाखवून ३२ वर्षीय महिलेवर २६ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. लग्नाला नकार दिल्यानंतर महिलेने संबंध तोडले असता या तरुणाने व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तसेच बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करून पुन्हा अत्याचार केला. याप्रकरणी गुरुवार, ६ जून रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात भुमेश बापू निंबाळकर (२६, रा. अयोध्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३२ वर्षीय महिला खासगी नोकरीला आहे. तिची भुमेश निंबाळकर याच्याशी ओळख झाली. या ओळखीतून दोघांमध्ये प्रेम जुळले त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत या तरुणाने तिच्यावर अत्याचार केला याचे त्याने व्हिडीओदेखील केले त्यानंतर भुमेशने महिलेला लग्नास नकार दिला. त्यामुळे महिलेने त्याच्या सोबत संबंध तोडले होते. असे असताना भुमेशने महिलेला व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली, तसेच बंदुकीचा धाक्क दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ही घटना २१ मे २०२१ ते २५ में २०२४ दरम्यानच्या काळात घडली. हा प्रकार सहन न झाल्याने पीडित महिलेने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
आधी लग्नाचे आमिष दिले,नंतर फोटो व्हिडीओ तसेच बंदुकीचा धाक दाखवित महिलेवर वारंवार अत्याचार केला, आरोपी विरोधात गुन्हा दाखल
