मोताळाः कार घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणत एका ३६ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना २३ मे २०१८ ते ७ मार्च २०२४ दरम्यान खरबडी येथे घडली आहे. प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या सात जणांविरुद्ध बोराखेडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील खरबडी येथील रहिवासी सध्या मोताळा येथे वास्तव्यास असलेल्या एका ३६ वर्षीय विवाहितेने बोराखेडी पोलीसात फिर्याद दिली. त्यात म्हंटले आहे की २३ मे २०१८ ते ७ मार्च २०२४ दरम्यान खरबडी येथील फिर्यादीचे पती नामदेव जगदेव वाकोडे यानी कार घेण्यासाठी पाच लाख रुपये माहेरून घेऊन ये असे म्हणत फिर्यादीस वेळोवेळी मारहाण करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. सोबतच शारीरिक व मानसीक छळ केला आहे तर जगदेव सुखदेव वाकोडे, कुसुम जगदेव वाकोडे, प्रकाश जगदेव वाकोडे, प्रतिभा प्रकाश वाकोडे (सर्व रा. खरबडी) आणी खामगावातील तालुक्यातील उन्ना येथील नातेकीकांनीही चिथावणी दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. प्रकरणी पोलिसांनी उपरोक्त सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,