Headlines

खासगी बसला आग, सुदैवाने जीवितहानी नाही, लग्न आटपून बुलढाणा येत होते 48 वऱ्हाडी मंडळी, मेहकर फाट्यावरील घटना

चिखली : खासगी बसला आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाल्याची घटना आज दि. 25 जून रोजी सकाळी चार वाजताच्या सुमारास चिखली शहराजवळ असलेल्या मेहकर फाट्यावर घडली असून या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र प्रवासी असलेल्या 48 वऱ्हाडांचे सामान जळून खाक झाले आहे याबाबत

प्राप्त माहितीनुसार वऱ्हाडी मंडळी चंद्रपूर येथून बुलडाणा येथे लग्न आटोपून येत होते. पहाटे मेहकर फाट्यावर खासगी बस चहापाणी करण्यासाठी थांबली होती यावेळी काही प्रवासी झोपेत होते. मात्र शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवाशी खाली पळाले. काही क्षणात आगीने रुद्र रूप धारण केले होते.या बसचा काही वेळातच कोळसा झाला. घटनास्थळी तातडीने अग्निशामक वाहन पोहोचले मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. बस मध्ये असलेले वऱ्हाडाचे सामान पूर्णपणे जळाली असून त्यामध्ये नवे कपडे, मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *