Headlines

घर बंद करून परिवारासह पुण्याला गेले, संधीचा फायदा घेत चोरट्याने घर साफ केले, 1 लाख 35 हजारांचा मुद्देमाल लंपास.. खामगावची घटना

 

खामगाव:- संधीचा फायदा घेत येथील एमआयडीसी भागातील गौरा नगरातील एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी उघडकीस आली.

तक्रारीनुसार, प्रदीपकुमार डिगांबर इंगळे (३४) हे परिवारासह पुणे येथे गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात
चोरट्यांनी इंगळे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील देवी देवतांच्या मूर्ती, सोन्याची अंगठी सोन्याची चेन असा एकूण एक लाख ३५ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार इंगळे हे १ जुलै रोजी घरी आल्यानंतर उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *