Headlines

दर्शनासाठी गेलेल्या नांदुऱ्यातील 21 वर्षीय तरुणाचा ओंकारेश्वर येथे पाण्यात बुडून मृत्यू

नांदुरा : मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या येथील एका 21 वर्षीय युवकाचा नर्मदा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना 6 जून रोजी उघडकीस आली आहे. ओम संजय पेठकर असे या युवकाचे नाव आहे. येथील रहिवासी ओम पेठकर वय 21 | हा काही मित्रांसोबत ओंकारेश्वर येथे देव दर्शनासाठी गेला होता. दरम्यान, 5 जून रोजी सकाळच्या सुमारास तो तेथील नर्मदा नदीत स्नान करण्यासाठी पाण्यात उतरला. परंतु, त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्याच्या इतर मित्रांनी त्याचा शोध घेतला. तरीही ओम दिसत नसल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती लगेच स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात शोध घेऊन ओमला बाहेर काढले. परंतु, तोपर्यंत बराच वेळ निघून गेल्याने ओमचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. ओंकारेश्वर येथे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नांदुरा येथे आणण्यात आला. त्यानंतर 6 जून रोजी सकाळी त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!