मलकापूर: तालुक्यातील मौजे अनुराबादेत सोमेश्वर मंदिरात देवाच्या दागीन्याची चोरी करणाऱ्या भामट्याला गावकऱ्यांनी धो धो धुवून पोलिसांच्या स्वाधीन केले.आज बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेतील चोरट्याने आणखी चार ठिकाणी चोरी केल्याच उघडकीस आले आहे.त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मौजे अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिरात देवाच्या दागीन्याची व साहित्याची चोरी करतांना गावकऱ्यांनी भामट्या चोराला रंगेहाथ पकडले.आज बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत महिन्यांपूर्वी गावातीलच हनुमान मंदिर मुर्तीचा कंबरपट्टा चोरणारा भामटा तोच असल्याने संतप्त गावकऱ्यांनी त्याला धो धो धुवून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे तालुक्यातील मौजे हरसोडा ,मोमीनाबाद,इसरखेड आदी ठिकाणांसह मलकापूर येथील जाधववाडी परिसरातील हनुमान मंदिरातील दागीन्यांची चोरी देखील अनुराबादेत सोमेश्वर मंदिरात पकडण्यात आलेल्या भामट्या चोराने केली आहे.असे ठामपणे गावकऱ्यांनी सांगितले आहे.
या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता तो भामटा नांदुरा तालुक्यातील मौजे सावरगांव नेहू येथील रहिवासी आहे.उमेश श्रिकृष्ण सुल्ताने वय २६ असे त्या भामट्याचे नांव असल्याचे पुढे आले आहे.या प्रकरणी दिपक मधू फिरके रा.झोडगा ता.मलकापूर यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.त्या अनुषंगाने पोलिसांनी भामट्या चोराला ताब्यात घेतले असून पोलिस कारवाई सुरू आहे.
लालसेपोटी फसला चोर…!
अनुराबादेत सोमेश्वर मंदिरात देवाच्या दागीन्याची व साहित्याची चोरी करतांना गावकऱ्यांनी भामट्या चोराला रंगेहाथ पकडले. एका महिन्यांपूर्वी त्याच चोरट्याने हनुमान मंदिरातील मूर्तीचा कंबरपट्टा पळवला होता.ती घटना सिसीटीव्हीत कैद झाली होती मात्र चोरटा पसार झाला होता.पण चोरीच्या लालसेने तो पुन्हा एकदा आला अन् गावकऱ्यांच्या जाळ्यात अडकला आहे.