Headlines

डॉ.राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी,मलकापूर येथील विद्यार्थ्यांची निकाला पूर्वीच नामांकित कंपनी मध्ये नेमणूक

मलकापूर :- डॉ.राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी,मलकापूर येथील बी.फार्मच्या आठ विद्यार्थ्याची विविध नामांकित कंपन्यामध्ये विविध पदावर निवड झाली. त्यापैकी कु. सनोबर सय्यद या विद्यार्थिनीची नेमणूक टाटा कन्सल्टनसी नागपूर येथे फार्माकोविजीलांस असोसिएट या पदावर २.४० लक्ष वार्षिक वेतनावर नेमणूक देण्यात आलेली. कुणाल देशमुख या विद्यार्थ्याची IKS हेल्थकेअर,कोयाम्बतूर येथे मेडिकल scribe या पदावर ४.८० लक्ष वार्षिक वेतनावर नेमणूक देण्यात आलेली. श्रेयस सवाइतुल या विद्यार्थ्याची अरीन हेल्थकेअर नागपूर या कंपनी मध्ये Business Executive या पदावर २.२० लक्ष वार्षिक वेतनावर नेमणूक देण्यात आलेली. तसेच पाच विद्यार्थ्याची अडवानटमेड अमदाबाद येथे मेडिकल कोडर या पदावर 3 लक्ष वार्षिक वेतनावर नेमणूक देण्यात आलेली.नेमणूक झालेल्या विद्यार्थ्याची नावे आरजू भिवगडे, अचल वाघोदे, कल्पेश कुकडे, विजय खुले व मंगेश गरकल आहेत.

तसेच डी.फार्म च्या सात विद्यार्थिनींची अॅलेम्बिक फार्मासुटीकल लिमिटेड या कंपनी मध्ये निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थाची नावे पुढील प्रमाणे कु वैष्णवी मेहंगे, कु दिव्या उगले, कु साक्षी अवचार, कु नेहा इंगळे, कु कोमल इंगळे, कु मुस्कान शैख व कु निकिता काजळे या विद्यार्थीनीना प्रोडक्शन ट्रेनि या विभागामध्ये २.४० लक्ष वार्षिक वेतनावर नेमणूक देण्यात आलेली आहे.
सदर विद्यार्थ्याच्या नेमणुकीसाठी प्राचार्य डॉ.प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे प्रा. रितेश पोपट, प्रा. निशांत चोपडे व प्रा. राहुल दराखे यांनी परिश्रम घेतले. इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था,बुलडाणा चे अध्यक्ष माननीय श्री. योगेंद्रजी गोडे साहेब व सचिव कु. तन्वी गोडे मॅडम यांनी नेमणूक झालेल्या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. तसेच मागील वर्षी सुद्धा ४८ विद्यार्थ्यांची नेमणूक ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल व्दारा करण्यात आली होती व तीच परंपरा पुढे चालू ठेवण्या करिता अथक परिश्रम करण्या ची ग्वाही महाविद्यालय तर्फे देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *