Headlines

कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला दिन साजरा

 

मलकापूर – पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “विविध शासकीय योजनांच्या साहाय्याने उद्योजक कसे बनावे” या विषयावर तज्ज्ञ व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महिला उद्योजकता कक्षाने महिला विकास कक्षाच्या सहकार्याने केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ. उषा वनारे उपस्थित होत्या. त्या दुर्गामाता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, रामवाडी मलकापूरच्या अध्यक्षा तसेच जलसाक्षरता जल संधारण विभागाच्या जिल्हा अध्यक्षा आहेत. याशिवाय त्या राष्ट्रीय सरपंच संसद जिल्हा अध्यक्ष, महिला तक्रार निवारण केंद्र संचालिका, पोलीस महिला दक्षता समिती सदस्य, तक्रार समिती पंचायत समिती सदस्य आणि बचत गट संचालिका म्हणून कार्यरत आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे यांनी भूषविले. सोबतच या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे व राशी व कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सचिन बोरले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आचल गोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. शारदा लांडे यांनी मानले. संचालन अपूर्वा आहेर आणि महिमा जगताप यांनी केले. या कार्यक्रमात प्रा. माधुरी राजपूत, प्रा. संगीता खर्चे, डॉ. मंजिरी करांडे, प्रा. माधुरी चौधरी, प्रा. भाग्यश्री नारखेडे, प्रा. ऋतुजा पाटील, प्रा. स्नेहल पवार, प्रा. पूनम पट्ठे, प्रा. शिवानी राजपूत, प्रा. साक्षी जुनारे, प्रा. चैताली नारखेडे, सुलभा पवार यांचीही उपस्थिती होती.

या व्याख्यानातून विद्यार्थिनींना उद्योजकतेविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. विविध शासकीय योजनांचा लाभ घेत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबाबत त्यांना प्रेरणा मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!