Headlines

राष्ट्रीय यशाच्या निमित्ताने कोलते महाविद्यालयात सन्मानाचा क्षण

 

मलकापूर:- स्थानिक पदमश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे. महाविद्यालयाच्या आयडिया इनोव्हेशन प्रोजेक्टची निवड राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी देशाची राजधानी दिल्ली येथे करण्यात आली असून, या प्रकल्पाने महाराष्ट्राचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व केले आहे.

महाविद्यालयातील प्रा. लेफ्टनंट मोहम्मद जावेद यांच्या नेतृत्वाखालील टीमने, ज्यामध्ये कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रा. सुदेश फरपट, प्रा. विजय ताठे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी दीपक पालवे यांचा समावेश होता, त्यांनी प्रकल्पाद्वारे लक्षणीय योगदान दिले. प्रकल्पाच्या प्रभावी सादरीकरणासाठी प्रा. जावेद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ठ जबाबदारी पार पाडली.

या निमित्ताने महाविद्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे व प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांच्या हस्ते प्रा. जावेद, प्रा. फरपट, प्रा. ताठे आणि दीपक पालवे यांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या प्रकल्पांना मिळालेल्या राष्ट्रीय मानांकनामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. डी. एन. पाटील उपाख्य श्री. नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदिपभाऊ कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोलते महाविद्यालयाची ही यशस्वी झेप विद्यार्थ्यांच्या अभिनव कल्पनाशक्तीला आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाला प्रेरणादायी आहे. महाविद्यालयाने राष्ट्रीय पातळीवर उंच झेप घेतल्यामुळे परिसरातील शैक्षणिक प्रतिष्ठा उंचावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!