मलकापूर : स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर
औद्योगिक क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या “औद्योगिक ऑटोमेशन – पीएलसी आणि स्काडा” या विषयावरील पाच दिवसीय मूल्यवर्धित कोर्स यशस्वीरित्या मागील आठवड्यात नुकतेच पार पाडले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त स्वागताने झाली. या कोर्सचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी ऑटोमेशन तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत, औद्योगिक क्रांतीमध्ये पीएलसी आणि स्काडा प्रणालींच्या वाढत्या गरजेवर भर दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पलीकडे जाऊन कौशल्याधारित प्रशिक्षण मिळावे यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
तांत्रिक कौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी नाशिक येथील “ऑटोटेक” संस्थेचे तज्ञ श्री. पंकज सोनवणे व श्री. सुमेध नारायणे या नामांकित व्यक्तिमत्त्वांचे मार्गदर्शन या कोर्समध्ये लाभले. त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनातून विद्यार्थी पीएलसी आणि स्काडा च्या प्रोग्रामिंग, ऑपरेशन, आणि औद्योगिक अनुप्रयोगांची सखोल माहिती मिळवली .
महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांच्या अमूल्य मार्गदर्शन व सहकार्यामुळे हा कोर्स यशस्वीरीत्या राबवण्यात आला. गुणवत्तापूर्ण शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या महाविद्यालयाच्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाची सांगता प्रा. संदीप मुंडाळे यांच्या मनोगताने झाली. त्यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार मानले. ही पाच दिवसांची मूल्यवर्धित कार्यशाळा विद्यार्थ्यांना उद्योगासाठी अत्यावश्यक कौशल्ये प्रदान केले आणि त्यांचे भविष्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अशी माहिती विभागप्रमुख प्रा. साकेत पाटील यांनी दिली अशा उपक्रमांमुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. असे वक्तव्य महाविद्यालयाचे खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे व सदस्य श्री. अनिल इंगळे यांनी केले.