लाखनवाडा बु ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) – गावातील अनिस खान हाशम खान (वय ४०) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. २९ मार्चच्या मध्यरात्री १ ते ३ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि कपाटातील रोकड तसेच सोन्याचे दागिने लंपास केले.
या चोरीत दोन लाख वीस हजारांची रोख रक्कम, ५०,००० किंमतीचे सोन्याचे दागिने, तसेच ५ ग्रॅमचे पेंडल (२५,००० रुपये) असा एकूण २.९५ लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. अनिस खान यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे. घटनेची गंभीर दखल घेत डीवायएसपी खामगाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले, मात्र अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास चौधरी आणि बीट एएसआय आनंदा वाघमारे करीत आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सावधगिरी बाळगावी, अशी सूचना पोलीस प्रशासनाने केली आलंपा