Headlines

पहाटेच्या अंधारात चोरट्यांचा धाडसी डाव; पिंपळगाव सराई येथे ९२ हजारांचा ऐवज लंपास

पिंपळगाव सराई : गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणी आला असून पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका घरावर डल्ला मारत दागिने व रोख रक्कम असा सुमारे ९२ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी पहाटे अंदाजे २ वाजताच्या सुमारास फिर्यादी विशाल रामलाल शिंगणे (वय ३४, रा. पिंपळगाव सराई) हे आपल्या कुटुंबीयांसह घरात झोपलेले असताना घरात काही वस्तू पडल्याचा आवाज आला. त्याचवेळी शेजाऱ्यांनी आरडाओरड केल्याने घरात घुसलेली अज्ञात व्यक्ती घाईघाईने घटनास्थळावरून पसार झाली. यानंतर सकाळी घराची पाहणी केली असता घरातील दोन लोखंडी पत्र्याच्या पेट्या घरामागील शेतात फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आल्या. मात्र त्या पेट्यांमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण अंदाजे ९२,२०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या घटनेची तक्रार रायपूर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका कैलास खारडे व पोका काझी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!