Headlines

नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, पोलीस कर्मचाऱ्याचा त्रास असह्य झाल्याने आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

खामगाव – वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेच्या तयारीत असलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. प्रसन्न वानखडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी होता. अकोल्यातील आकाशवाणी परिसरात स्थित जलाराम सोसायटी येथे तो आपल्या भावाच्या खोलीत राहत होता. तेथे गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे. प्रसन्नच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जात असून, त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!