बुलढाणा : – शहरातील कारंजा चौकात ७ एप्रिल रोजी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. “कानमंत्र देतो” असे सांगत एका अज्ञात व्यक्तीने निवृत्त मुख्याध्यापक बंडू चव्हाण (वय ७९, रा. चेतनानगर) यांची १२ ग्रॅम सोन्याची अंगठी फसवणूक करत लंपास केली.
संत-महात्म्यांची नावे घेत, धार्मिकता आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करत आरोपीने चव्हाण यांना भावनिक जाळ्यात ओढले. अंगठी रुमालात गुंडाळून ठेवण्याचा सल्ला देत, पुढे जाण्यास सांगितले. काही वेळाने रुमाल उघडला असता अंगठी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकारानंतर चव्हाण यांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचे चित्र कैद झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.