मलकापुर:- मलकापुर शहर शिवसेनेतर्फे शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि.19 जुन गुरुवार रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्थानिक छत्रपती शिवाजी नगरातील तुळजाभवानी मंदिरात जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने ,शहरप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपुत तालुकाप्रमुख दिपक चांभारे सह आदिंनी आई तुळजाभवानीची विधिवत पुजा करीत माल्यार्पण केले.तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करुन माल्यार्पण करण्यात आले, उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप, आत्मानंद जैन मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले,शहिद संजयसिंग राजपूत,शहिद अब्दुल हमीद चौकात माल्यार्पण करण्यात आले.शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या प्रमुख उपस्थितीत रफीक भाई पजायेवाले, समीर मुन्ना चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी भगवा दुप्पटा घालून सत्कार केला.यावेळी कामगार सेना शहर प्रमुख हरीदास गणबास,किसानसेना शहर प्रमुख सै.वसीम सै.रहिम, वाहतूकसेना शहरप्रमुख इम्रान लकी, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे,उपशहरप्रमुख शकील जमादार,उपशहरप्रमुख समद कुरेशी,युवासेना तालुकाप्रमुख पवन गरुड,माजी नगरसेवक पांडुरंग चिम, विभाग प्रमुख राजेंद्र काजळे, आकाश बोरले,अक्षय सातव,विभाग प्रमुख गणेश सुशीर, विश्वनाथ पुरकर, गणेश सुरडकर, शांताराम धाडे,अमोल धाडे, गणेश पुरकर,दिपक कोथळकर,सह आदिंची उपस्थिती होती.