Headlines

रिपाई आंबेडकर बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी-पॅंथर प्रफुल तायडे यांची नियुक्ती

जळगाव जामोद- मा.दीपक निकाळजे, राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) यांच्या आदेशानुसार आणि मा. मोहनलाल पाटील साहेब, राष्ट्रीय महासचिव, मा. बाळासाहेब पवार, प्रदेश कार्यअध्यक्ष, मा. पश्चिम विदर्भ अध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई संतोष इंगळे , बुलढाणा कार्य अध्यक्ष भास्कर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पदाच्या नियुक्ती बुलढाणा जिल्हा अध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ अध्यक्ष मा. भाई संतोष इंगळे यांच्या हस्ते पदनियुक्त देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने महिला व पुरुष युवा आघाडीचे पदअधिकारी व कार्यकर्ते यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा जिल्हा उपाअध्यक्षपदी पॅंथर प्रफुल तायडे यांची नियुक्ती करण्यात आली. जळगाव जामोद तालुक्यातील अग्रेसर राजकीय नेत्यांमध्ये त्यांचं नाव आहे. यांनी काही महिने अगोदर पक्षामध्ये प्रवेश केला होता. जळगाव जामोद तालुका अध्यक्ष या पदावर ते कार्यरत असताना. त्यांच्या कामाचा आढावा घेत जिल्हा अध्यक्ष यांनी त्यांची नियुक्ती जिल्हा उपाअध्यक्ष पदी केलेली आहे. त्यांना तालुक्याच्या पदावरून जिल्ह्यामध्ये वर्णी लागली आहे . तालुक्यामधून त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर हा पक्ष आहे. माझ्या सर्व समवेशक कार्याची ओळख महाराष्ट्रभर पक्षाच्या मार्फत एक नवी अवलौकिक छबी तयार झाली याची मला खात्री आहे.हाच पक्षाच्या वरिष्ठांचा विश्वास कायम ठेवून मी पदाची गरिमा राखत निष्ठेने व पक्षाच्या वैचारिक भावनेने माझे कार्य पार करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!