Headlines

अनोळखी इसमाचा फुटपाथवर आढळला मृतदेह, शेगाव येथील घटना

शेगाव: स्थानिक स्टेट बँकेजवळील फुटपाथवर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना घडली. सदर घटना २० फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शहरातील अकोट रस्त्यावर राहणारे गजानन विश्वासराव साखरपांडे (वय ४३) हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचे कार्य करतात. विशेषतः निराधार व भिकारी व्यक्तींना अन्नदान करण्याचे कार्य ते नियमितपणे करत असतात. दररोजप्रमाणे काल रात्री ९.३० वाजता ते स्टेट बँकेजवळ गेले असता, त्यांनी तेथे एका अनोळखी इसमाला हालचालविना झोपलेले पाहिले. त्यांनी त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, त्यांनी प्राथमिक तपासाअंती सदर इसम मरण पावल्याचे निष्कर्ष काढले. याप्रकरणी साखरपांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी भादंवी कलम १७४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत इसमाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!