बुलढाणा : जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काल सुद्धा बुलढाणा शहरातील मोबाइल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला ही घटना काल ६ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांचा दुकान फोडून चोरी करतानाचा व्हिडीओ सीसी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
याबाबत सविस्तर अशी की शहरातील संगम चौक परिसरात एसटी महामंडळांचे व्यापारी संकुल आहे. त्यामध्ये असलेली मोबाइल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी ५ ऑक्टोबरच्या रात्री दुकानात प्रवेश केला. तसेच दुकानात ठेवलेले मोबाईल व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे म्हटले आहे.