Headlines

तोंडाला रुमाल, हातात छत्री, चेहरा झाकला पण दोन अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न फसला.. एकाच रात्री दाताळा आणि शेलापुरचे एटीएम फोडण्याचा होता प्रयत्न..

मलकापूर :- तोंडाला रुमाल हातात छत्री घेऊन आलेल्या दोन चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला ही घटना दाताळा आणि शेलापुर या ठिकाणी आज सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असून एटीएमचा सायरन चा आवाज आल्याने चोरट्यांनी काढता पाय घेत पसार झाले. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे सेंट्रल बँकेचे एटीएम आहे. या एटीएम मध्ये आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मारुती कंपनीच्या चार चाकी वाहनाने दोन जण आले होते. या दोघांच्या तोंडाला रुमाल आणि हातात छत्री होती. दोघेजण याच वेशात एटीएम मध्ये शिरून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला दरम्यान एटीएम फोडत असताना एटीएम मशीन चा सायरनचा आवाज आल्याने दोन अज्ञात चोरट्यांनी तेथून काढता पाय घेत चार चाकी वाहनाने पसार झाले. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. दरम्यान चोरटे एवढ्यावरच न थांबता शेलापुर येथे जाऊन तेथेही एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा व्हिडिओ एटीएम मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झाला आहे. मलकापूर ग्रामीण पोलीस अज्ञात चोरट्यांच्या शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *