Headlines

ऑटोत महिलेच्या शेजारी बसलेल्या महिलेने पर्समधून ४८०० रु केले लंपास, अज्ञात चोरट्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव : बस स्थानकापर्यंत जाण्यासाठी ऑटोत बसलेल्या महिलेच्या दुसऱ्या महिलेने पर्समधून अलगदपणे ४८२५ रु. लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत सुरेखा संजय बोरकर (४०) रा. नांदुरा यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली त्यावरून शहर पोस्टेत अज्ञात चोरट्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्या सोमवार ५ ऑगस्ट रोजी नांदुरा रोडवरील महाराष्ट्र बँकेसमोरुन बसस्थानकापर्यंत येण्यासाठी एका ऑटोत बसल्या. टॉवर चौकात त्याच ऑटोत आणखी तीन महिला बसल्या. दरम्यान प्रवासात यातील शेजारी बसलेल्या महिलेने त्यांच्या पर्समधून ४८२५ रुपये अलगदपणे काढुन घेतले. या प्रकरणी शहर पोलिसांनी सदर अज्ञात महिलेविरुध्द कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *