खामगाव: शहरातील डी. पी. रोड परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दोन अज्ञात चोरटे पसार झाल्याची घटना घडली.
मंदा मधुकरराव देशमुख (७०) या २९ मार्च रोजी रात्री ८:३० वाजता चिंतामणी गणपती मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत होत्या. घराजवळील पंजाबीताई यांच्याशी त्या बोलत असताना, दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. त्यातील २० ग्रॅम सोन्याचा भाग गळ्यातच राहिला, तर १० ग्रॅम सोन्याची पोथ घेऊन चोरटे फरार झाले. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
खामगावमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी
