Headlines

दुचाकीने जात असताना नायलॉन मांजाने गळा चिरला, माजी सरपंच गंभीर जखमी; मोताळा – मलकापूर रस्त्यावरील घटना!

मोताळा – मकरसंक्रांतीच्या तोंडावर नायलॉन मांजाचा वापर थांबवण्यात प्रशासनाचे अपयश दिसून आले आहे. मोताळा शहरातील ६२ वर्षीय माजी सरपंच अशोक नंदलाल झंवर यांना नायलॉन मांजामुळे गळ्याला गंभीर दुखापत होऊन रुग्णालयात दाखल करावे लागले.घटना मोताळा-मलकापूर रस्त्यावर घडली. झंवर हे दुचाकीवरून प्रवास करत असताना उडणाऱ्या नायलॉन मांजाने त्यांच्या गळ्याला लचके तोडले, ज्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीसाठी हलवावे लागले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.नायलॉन मांजाचा विक्री आणि वापर रोखण्यात यंत्रणेला अयशस्वी ठरल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्थानिकांनी संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या घटनेमुळे प्रशासन आणि पोलिसांनी मकरसंक्रांतीपूर्वी कडक उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. नागरिकांनीही जबाबदारीने सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!