Headlines

मला तुझ्यासोबत थोडे बोलायचे आहे, असे सांगून 19 वर्षीय युवतीला लॉजवर नेले आणि नको ते केले; शेगांव येथील घटना

 

शेगाव : येथील मंदिर परिसरात असलेल्या एका लॉजवर २ फेब्रुवारी रोजी १९ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात ३ फेब्रुवारी रोजी आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित युवतीने शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास आरोपी आकाश सोनाजी भामद्रे (रा. सोनाळा) याने दर्शन झाल्यानंतर “तुझ्यासोबत थोडे बोलायचे आहे” असे सांगून तिला मंदिर परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे युवतीची इच्छा नसताना आरोपीने वाईट उद्देशाने नको ते कृत्य करत जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, या घटनेची माहिती कोणालाही दिल्यास जिवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पीडित युवतीच्या तोंडी फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ७४, ३५१ (२) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत कलम ३ (१) (w) (i), ३ (१) (w) (ii) आणि ३ (२) (v) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेगाव शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!