Headlines

नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार; ६० वर्षीय आरोपीला अटक; शेगांव तालुक्यातील धक्कादायक घटना!

 

शेगाव – तालुक्यातील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात नऊ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना २१ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या ३७ वर्षीय आईने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी माणिकराव दामोधर (वय ६०) याने मुलीला पैशाचे प्रलोभन दाखवून आपल्या घरात नेले आणि खोलीत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर पालकांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पॉक्सो) कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरीत हालचाल केली आणि आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!