मलकापूर ( उमेश इटणारे ): भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभेच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात बुलडाणा जिल्ह्यातील तीनही भाजपाच्या विद्यमान आमदारांची नावे असून मलकापूर विधानसभा मतदार संघाचा समावेश नसल्याने मलकापूर मतदार संघातून भाजपाचा उमेदवार कोण? अशी चर्चा पुन्हा जोर धरू लागली होती. मलकापूर मतदार संघात मनीष लखानी यांच्या नावाची चर्चा सुरू होती. सोशल मीडियावर सुद्धा मनीष लखानी यांना तिकीट जाहीर झाले असे मेसेज व्हायरल झाले होते. त्यानंतर विदर्भ लाईव्हने व्हायरल मेसेज बाबत बातमी प्रकाशित केली होती मात्र आता नवीन माहिती समोर आली आहे. भाजपकडून माजी आमदार चैनसुख संचेती यांना तिकीट मिळणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी विदर्भ लाईव्ह ला सांगितले आहे. येत्या काही दिवसात तिकीट जाहीर होईल ? असे सुद्धा सांगण्यात आले आहे. दरम्यान मलकापूर विधानसभा मतदारसंघात 2019 साली झालेली लढत पुन्हा होणार आहे का ? हे बघणे महत्त्वाचे राहील.. तूर्तास एवढेच ?