Headlines

विजयादशमी उत्सव तथा शस्त्रपूजन निमित्त रा.स्व. संघ मलकापूर चे पथसंचलन १३ ऑक्टोंबर रोजी होणार

 

मलकापूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मलकापूर नगराच्या वतीने विजयादशमी तथा शस्त्रपूजन या जाहीर उत्सवाचे आयोजन रविवारी, 13 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.15 वाजता प.पू. डॉ. हेडगेवार सभागृह मैदानात पार पडणार आहे. तर राष्ट्र सेविका समिती चे विजया दशमी उत्सव दि. १४ ऑक्टोंबर रोजी ४.१५ वाजता याच मैदानावर होणार आहे.
विजयादशमी निमित्ताने शहरात आकर्षण असलेलं रा.स्व.संघाचं पथसंचलन हे दसऱ्याच्या दिवशीच व्हायचे मात्र या वर्षी पथसंचलन हे दि. 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.30 वाजता होणार आहे. त्या अनुषंगाने पूर्ण गणवेशात सर्व स्वयंसेवकांनी प.पू. डॉ. हेडगेवार सभागृहासमोरील मैदानावर पथसंचालनासाठी उपस्थित राहावे.
दरम्यान उत्सवाचे प्रमुख अतिथी म्हणून मलकापूरचे प्रसिद्ध उद्योजक श्री. प्रसन्नजी देशपांडे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून पश्चिम क्षेत्र प्रचारक (केंद्र पुणे) श्री. सुमंतजी आमशेकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

नगर संघचालक श्री. दामोदर कि. लखाणी आणि नगर सहसंघचालक श्री. राजेश द. महाजन यांनी मलकापूर मधील संघप्रेमी नागरिकांना या कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!