Headlines

हिराबाई संचेती कन्या शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम

 

मलकापूर :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 चा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. या परीक्षेकरिता हिराबाई संचेती कन्या शाळेच्या 82 विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या असून त्यापैकी 77 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. शाळेचा निकाल 93.90% लागलेला आहे .प्राविण्यश्रेणीत एकूण 30 , प्रथम श्रेणीत 29 आणि द्वितीय श्रेणीत 18 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत .या परीक्षेत कु. अस्मिता पुरुषोत्तम गारमोडे हिने 93.80% गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक ,कु.पुष्पा कैलास घुले हिने 92.80% गुण मिळवून द्वितीय क्रमांक ,कु प्रणाली श्रीकृष्ण बोराडे हिने 91.40% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे .तसेच कु.लक्ष्मी महादेव भगत 90.20% ,कु. भाग्यश्री गोपाळ पाटील 89.60% गुण मिळवून यशस्वी झाल्या आहेत. यश संपादन केलेल्या व उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे मलकापूर शिक्षण समितीचे सर्व माननीय संचालक मंडळ तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ममताताई पांडे शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!