मलकापूर:- तालुक्यातील धरणगाव परिसरात आज, 7 जानेवारी रोजी सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. एका किन्नराचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृतदेहाजवळील स्थिती पाहता डोक्यावर आणि मानेवर मारहाणीचे गंभीर निशाण स्पष्टपणे दिसत आहेत. या क्रूर हत्येमुळे किन्नर समाजात चिंता व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीससह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजेरी लावली आहे.
सध्या हत्येचे कारण आणि मारेकरी कोण याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली असून सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांच्या चौकशीसह विविध दिशांनी तपास केला जाणार आहे. या घटनेचा अधिकृत तपशील अद्याप मिळालेला नसला, तरी किन्नर कुटुंबीय व स्थानिकांकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
मलकापूर तालुक्यातील खळबळजनक घटना; धरणगाव परिसरात डोक्यात व मानेवर व मारून किन्नरचा खून
