बसस्थानकासमोर उभ्या दोन मॅजिक गाड्यांना आग; शहरात खळबळ
शेगाव – शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शेगाव शहरात मंगळवारी सकाळी घडलेल्या एका अघोषित घटनेने शहरवासीयांमध्ये खळबळ उडवली आहे. शेगाव बसस्थानकासमोर उभ्या असलेल्या दोन मॅजिक वाहनांना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आगीची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत दोन्ही…
