Headlines

महाविद्यालयाच्या प्रगतीत मोठी भरारी – पद्मश्री डॉ. व्ही. बि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयास एनबीए चा बहुमान!

मलकापूर: स्थानिक मलकापूर येथील पद्मश्री डॉ. व्ही. बि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाने राष्ट्रीय मान्यता मंडळाची नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिटेशन एनबीए प्रतिष्ठेची सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल मान्यता प्राप्त केली आहे. या मान्यतेमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची अधिकृत मोहर लागली असून, विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी नवी दारं खुली झाली आहेत. राष्ट्रीय मान्यता मंडळ एन बी ए ही भारतातील तांत्रिक शिक्षण संस्थांसाठी…

Read More

तहसीलदार कार्यालयातील चालक व खाजगी वाहन चालकावर तस्करीचा आरोप; प्रशासन दलाल की रक्षक?

मलकापूर – तहसीलदार मलकापूर यांच्या शासकीय वाहन चालक व खाजगी वाहन चालकाचा वाहन बायोडिझेल तस्करांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात मुनna राठोड यांनी उपविभागीय कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शासकीय वाहन चालक दिलीप तायडे यांचे तस्करांशी आर्थिक व्यवहार असून, मोठ्या प्रमाणावर बायोडिझेलचा अवैध साठा आणि वाहतूक होत असल्याचा दावा करण्यात आला आहे….

Read More

फार्मर आयडी शेतकऱ्याची ओळख – तहसीलदार राहुल तायडे

  मलकापूर :- तालुक्यात जांभूळधाबा, आळंद, दूधळगाव गाव येथे अग्रिस्टक योजनेचा कॅम्प आयोजित करण्यात आला. या ठिकाणी मोठया प्रमाणात शेतकरी वर्गाची उपस्थिती होती. सर्व शेतकरी बांधव यांना अग्रिस्टॅक योजनेबाबत माहिती देण्यात आली. भविष्यात शेतकरी यांना मिळणारे अनुदान, विमा योजना, शेतकरी विभागाचे कृषी विषयक योजना करीता फॉर्मर आयडी आवश्यक आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे…

Read More

विद्यार्थ्यांच्या गुणदर्शन कार्यक्रमात भरघोस सहभाग

  मलकापूर : दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, म्हैसवाडी येथे विद्यार्थ्यांचा ‘गुणदर्शन’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. निनिमा भुजाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सौ. निलिमा सजगुरु पोळ आणि अविनाश दत्तात्रय पांचाळ यांनी संयोजनाची जबाबदारी पार पाडली. यासोबतच संतोश…

Read More

गॅस सिलिंडरचा स्फोट; तिघेजण गंभीर जखमी; खामगाव शहरातील घटना!

खामगाव: स्थानिक मेहबूब नगर भागात गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बुधसन कुटुंबीय कॉटन कँडी (बुड्डी के बाल) व्यवसाय करतात. १२ फेब्रुवारी रोजी पहाटे कॉटन कँडी तयार करत असताना घरगुती गॅस सिलिंडर गळतीमुळे अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत मुकेशकुमार बुधसन (४०), योगेशकुमार बुधसन (२५) आणि सोनुकुमार बुधसन (२०) हे तिघे गंभीर जखमी…

Read More

मलकापूर आगारासाठी एसटी कष्टकरी जनसंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

मलकापूर :- एसटी कष्टकरी जनसंघ मलकापूर आगार बुलढाणा विभागाच्या २०२५-२६ साठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरचिटणीस उमेशभाऊ पवार, विभागीय अध्यक्ष शिवाजी भाऊ आनंदे आणि विभागीय सचिव रामभाऊ सवडतकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वसहमतीने कार्यकारिणीची निवड करण्यात आली. बैठकीत कष्टकरी हक्क आणि संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा झाली. उपस्थित सर्व सदस्यांच्या एकमताने ही कार्यकारिणी…

Read More

आई-वडील घराबाहेर गेले, मुलाने घरात गळफास घेतला; बुलढाणा शहरातील घटना!

बुलडाणा: बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (१२ फेब्रुवारी) उघडकीस आली. ओजस (ओम) रमेश बाहेकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. वृंदावन नगरातील आपल्या घरी ओजसने छताला कपड्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. भारतीय सैन्यात सेवेत असलेले माजी सैनिक रमेश बाहेकर यांचा तो मुलगा होता. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या…

Read More

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तिघे गंभीर जखमी; निंबी फाटा येथील घटना!

माटरगाव :- जलंब-माटरगाव रोडवरील निंबी फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. ही घटना काल दि. 11 रोजी रात्री १० वाजता घडली असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या अपघातात मच्छिंद्र खेड येथील संजू भारंबे आणि भागवत भारंबे तसेच पहुर्जीरा येथील कृषी केंद्र…

Read More

मोताळा तालुक्यातील कोथळी येथील २७ वर्षीय महिला बेपत्ता!

मोताळा :- तालुक्यातील कोथळी येथील एका २७ वर्षीय महिला ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार, सादिक खान रोशन खान यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य रात्री जेवण करून झोपले होते. दरम्यान, मध्यरात्री १२.३० वाजता त्यांच्या पत्नी पाणी पिण्यासाठी उठल्या असता, मुलगी आसमा फिरदोस…

Read More

नांदुरा बसस्थानकावरून दुचाकीची चोरी, पोस्टेत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

नांदुरा :- नवीन बसस्थानक परिसरात दुचाकी चोरीची घटना घडली आहे. ही घटना १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते ११.३० च्या दरम्यान घडल्याचे समजते. तालुक्यातील वाडी येथील रहिवासी गोपाल सुखदेव चव्हाण, हे ऑटोचालक असून त्यांनी त्यांच्या एमएच २८-एपी ३०६५ क्रमांकाच्या दुचाकीला बसस्थानकात उभी केली होती. काही वेळानंतर दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध…

Read More
error: Content is protected !!