मलकापूरमध्ये चोरट्यांचा हैदोस – एकाच रात्री चार-पाच घरे फोडली, वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावून दागिने लुटले!

  मलकापूर: मलकापूर शहरातील बन्सीलाल नगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री चार ते पाच घरे फोडून मोठी चोरी केली. विशेषतः, एका वयोवृद्ध महिलेला धाक दाखवून तिच्या गळ्याला चाकू लावून चोरट्यांनी दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 6 मार्चच्या मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घडली. चोरट्यांनी एकामागोमाग तीन ते चार घरांना लक्ष्य करत चोरी…

Read More

मलकापूर न.प.च्या निष्क्रियतेविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचा गाढव मोर्चा

मलकापूर:- शहरातील चाळीसबिघा परिसरातील गणेशनगर येथे शांती आरोग्यम् हॉस्पिटल हे नगरपरिषदेची कोणतीही बांधकाम परवानगी न घेता उभारण्यात आले आहे. तसेच, आवश्यक नियमांची पूर्तता न करता या अवैध बांधकामाकडे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ५ मार्च रोजी न.प. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवत गाढव मोर्चा आंदोलन करण्यात आले. या…

Read More

सरपंचावर प्राणघातक हल्ला, एक आरोपी ताब्यात; खामगाव तालुक्यातील सुटाळा येथील घटना!

खामगाव :- तालुक्यातील सुटाळा फाटा येथे ग्रामपंचायत सरपंच निलेश देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान या हल्ल्यात झाले. हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने देशमुख यांच्या डोक्यावर गंभीर वार केले, मात्र ते थोडक्यात बचावले. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मयूर सिद्धपुरा याला अटक केली असून अन्य आरोपी फरार…

Read More

मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्या – शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे

मलकापूर: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून अमानवीय पद्धतीने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी मलकापूर तालुका शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) राष्ट्रीय महामार्गावरील दसरखेड एमआयडीसी फाट्यावर तीव्र निदर्शने करत मारेकऱ्यांच्या फाशीची मागणी करण्यात…

Read More

मलकापूर-खामगाव परिसरात अवैध दारू विक्रीला उत; उत्पादन शुल्क विभाग मूग गिळून गप्प

मलकापूर:- मलकापूर आणि खामगाव परिसरातील ढाबे, पानटपऱ्या, अंडा-ऑम्लेट सेंटर आणि चिकन सेंटरवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या ठिकाणी खुलेआम देशी-विदेशी दारू व बिअर विक्री होत असून, यामुळे शासनाच्या महसुलावर मोठा परिणाम होत आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे ही विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून,…

Read More

शासनाची कडक नियमावली फोल! परीक्षा केंद्र असुरक्षित! होमगार्ड सावलीत, कॉपी माफिया मोकाट, शासनाचा पगार – पण काम शून्य! बेजबाबदार होमगार्डवर कधी होणार कारवाई?

मलकापूर ( दिपक इटणारे ) – दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शासनाने कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मात्र, या उपाययोजना कागदावरच राहिल्या असून, प्रत्यक्षात परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थेचा खेळखंडोबा सुरू आहे. विशेषतः मलकापूर शहरातील काही परीक्षा केंद्रांवर ड्युटीवर असलेले होमगार्डच सुरक्षेला हरताळ फासत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. काही परीक्षा…

Read More

शालेय शिक्षणात कृषी विषय समाविष्ट करा – कृषीच्या विद्यार्थ्यांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

  महाराष्ट्र :- शालेय शिक्षणामध्ये कृषी विषय समाविष्ट करून अध्यापनाकरीता कृषी शिक्षक पद निर्माण करून कृषी पदविका, पदवीधर व पव्युत्तर पदवी (सर्व कृषीच्या शाखा) यांची नियुक्ती करावी, अशी मागणी मनीष मानकर (कृषी प्राध्यापक) आणि कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे उपाध्यक्ष संतोष लहाने यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. श्री. अंबादास दानवे यांना मुंबई येथे भेटून निवेदनाद्वारे…

Read More

किरकोळ वादातून चाकूहल्ला, दोघे गंभीर जखमी; खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील घटना!

  खामगाव: किरकोळ वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन चाकूहल्ल्याची गंभीर घटना शेलोडी (ता. खामगाव) येथे सोमवारी रात्री ९:३० वाजता घडली. या हल्ल्यात एका वृद्धासह त्याच्या मुलालाही गंभीर जखमी करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोहर विश्वनाथ गाडे (३७) यांच्या काका रघुनाथ हरिश्चंद्र गाडे यांचा पवन दशरथ बानाईत याच्यासोबत पूर्वी किरकोळ वाद झाला होता. या वादानंतर पवन…

Read More

वादातून कोयत्याने हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरातील घटना

  खामगाव : जुन्या वादातून बर्डे प्लॉट परिसरात एका व्यक्तीवर लोखंडी कोयत्याने हल्ला करण्यात आला. तसेच, त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार रविवारी रात्री घडला असून, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री सिमाबी मोहम्मद इरफान (३०, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) या घरासमोर पती मोहम्मद इरफान…

Read More

आसलगाव येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग; हजारोंचे नुकसान

  आसलगाव : – गावातील रमेश शंकर येनकर यांच्या घराला ३ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते. या आगीत घरातील फ्रिज, कुलर, टीव्ही, गृहउपयोगी साहित्य, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे तसेच रोख रक्कम २५ ते ३० हजार रुपये जळून खाक झाली. एकूण ७० ते ८० हजार रुपयांचे…

Read More
error: Content is protected !!