Headlines

बहिणीच्या लग्नाची शिदोरी आणण्यासाठी वाघूळला जात असताना उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली,एक युवक जागीच ठार, तर एक जखमी, नांदुरा मलकापूर रोडवरील घटना

नांदुरा :- उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून एक युवक जागीच ठार, तर एक जखमी झाल्याची घटना काल दि.१७ जून रोजी सकाळी नांदुरा मलकापूर रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर वडनेर भोलजी येथील टाटा सर्विस सेंटर समोर रस्त्यावर घडली. याबाबत फिर्यादी प्रशांत सखाराम लाहुडकर रा.भूत बंगला शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

मलकापुरात चोरट्यांची हिंमत वाढली, घरासमोर उभी असलेली चारचाकी चोरट्याने लांबविली, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा

  मलकापूर : घरासमोर उभी असलेली चारचाकी वाहन चोरीला गेल्याची घटना रविवारी रात्री शहरातील रामवाडी परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध सोमवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.रामवाडी परिसरात वास्तव्यास असलेले राजकुमार नारायण पाटील यांनी नेहमीप्रमाणे घराच्या अंगणात त्यांची एम.एच.१२/एच.एन. ६५२७ क्रमांकाची चारचाकी उभी केली होती. रविवारी सकाळी त्यांच्या अंगणातील चारचाकी वाहन दिसून…

Read More

शॉर्ट सर्किट मुळे दुचाकीला आग, मलकापूर शहरातील पंतनगर रोडवरील घटना

  मलकापूर :- शॉर्ट सर्किटमुळे दुचाकीला आग लागल्याची घटना आज दि.17 जून रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास मलकापूर शहरातील पंतनगर रोडवर घडली. शहरातील पंतनगर रोड वरून एक व्यक्ती दुचाकीने जात असतांना अचानक त्यांची दुचाकी रस्त्यावर बंद पडली. त्यांनी खाली उतरून दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेऊन चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु दुचाकी चालू होत नसल्याने त्यांनी गाडीचा…

Read More

शेतात बांधलेल्या वासरावर बिबट्याचा हल्ला; वासरू ठार, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

धामणगाव बढे : गुरांसोबत बांधून असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना धामणगाव बढेनजीक पांगरखेड शिवारात १६ जूनच्या रात्री घडली. १७ जून रोजी सकाळी वासराचा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. माजी सरपंच दिनकर बढे यांच्या शेतात दोन बैल, गाय आणि एक वासरू बांधलेले होते. या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. बढे यांनी वासराचा शोध…

Read More

वयोवृद्ध इसमाचा रेल्वेतून पडून मृत्यू, मलकापूर ग्रामीण पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

मलकापूर:- मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या शिरसोली शिवारात रेल्वेतून पडून 70 वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना 16 जून रोजी उघडकीस आली आहे. मृत वृद्धाची ओळख पटली नसून ओळख पटविण्याचे आवाहन मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरसोली शेत शिवारात एका 70 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून…

Read More

कोलते इंजिनिअरिंग मध्ये महाराष्ट्र राज्य संगणक टंकलेखन परीक्षा शिस्तीत व शासन नियमात संपन्न

मलकापूर:- राज्यात 10 जून ते 14 जून या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ची इंग्रजी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा पूर्ण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही या परीक्षेचे सात केंद्र आहेत. त्यापैकी पद्मश्री डॉ. व्ही बी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज मलकापूर येथील केंद्रावर सुद्धा संगणक टंकलेखन परीक्षा घेण्यात आली होती. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज बुलढाणा जिल्ह्यामधील एक नावाजलेले…

Read More

धरणगाव खून प्रकरणातील अटकेतील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी, दोघांची चौकशी सुरू.. आरोपी वाढण्याची शक्यता?

मलकापूर : तालुक्यातील धरणगावात डिडोळ्यातील युवकाची हत्या केल्याच्या आरोपावरून गावातील एकास पोलिसांनी मृतक दिपक सोनोने शुक्रवारी रात्री अटक केली. इतर दोन संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. अटकेतील आरोपीला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शनिवारी दिला. याप्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. धरणगाव येथील खंडोबा मंदिरानजिकच्या खुल्या सभागृहात मोताळा तालुक्यातील डिडोळ्याच्या २१ वर्षीय दीपक…

Read More

दुकानातील कॉम्प्रेसर सुरू करण्यासाठी गेलेल्या 48 वर्षीय इसमाचा शॉक लागून मृत्यू; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर:- शहरातील चाळीसबिघा परिसरातील 48 वर्षीय इसमाला इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 15 जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. या बाबत सविस्तर वृत्त असे की सुनील किसन ठोसर वय 48 वर्ष राहणार चाळीसबिघा यांचे पंचरचे दुकान असून आज सकाळी दुकानातील कॉम्प्रेसर सुरू करण्यासाठी गेले असता त्यानां इलेक्ट्रिक शॉक लागुन जागीच कोसळले….

Read More

मिनी ट्रकची दुचाकीला धडक ; पत्नीचा मृत्यू तर पती जखमी, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नांदुरा : भरधाव मिनी ट्रकचालकाने दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडी फाट्यानजीक १४ जून रोजी सकाळी ११:४५ वाजेदरम्यान घडली. याबाबत जानकीराम तुकाराम निंबाळकर (५९), रा. नवी येरळी, ता. नांदुरा यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये ते पत्नीसह दुचाकीने राष्ट्रीय महामार्गाने येत असताना वडी फाट्यानजीक…

Read More

मलकापूरची कन्या तलवारबाजी ची उत्कृष्ट खेळाडू कु. गौरी सोळंके हिची पुन्हा कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय स्पर्धा न्युझीलंड येथे होणार

मलकापूर:- मलकापूर ची शान म्हणजे तलवारबाजी ची उत्कृष्ट खेळाडू कु.गौरी मंगलसिंग सोळंके हिची न्यूझीलंड मध्ये होणाऱ्या 12 जुलै ते 19 जुलै 2024 दरम्यान कॉमनवेल्थ ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धेत निवड झाली आहे. मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथे रहिवासी तथा सध्या मलकापूर चैतन्यवाडी नगर मध्ये वास्तव्यास आहे. ही आपल्या मलकापूर वासियांसाठी गर्वाची बाब आहे.गौरी मुळे मलकापूर शहराचा तसेच जिल्हाचा…

Read More
error: Content is protected !!