मोताळा : महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम एच २८ बीबी ७४९१ हा संशयित वाहन खामगाववरून मोताळा येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोराखेडी पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. पोलिसांनी बोराखेडी फाटा येथे वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता, वाहनामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा आढळून आला.या कारवाईत २५,८२,००० रुपये किमतीचा गुटखा आणि पिकअप वाहनाची किमत ११,००,००० रुपये अशी एकूण ३६,८२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.काल मंगळवार, दि.१० डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, अपर पोलिस अधिक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बुलडाणा सुधिर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारंग नवलकार आणि बोराखेडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार पो. स्टे. बोराखेडी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.पोलिस टीममध्ये पो. उपनि. राजेंद्र कपले, पो. हे. कॉ. नंदकिशोर धांडे, रामदास गायकवाड, ना. पो. कॉ. श्रीकांत चिटवार, रमेश नरोटे, पो. कॉ. गणेश बरडे, श्रीकांत चिंचोले, वैभव खरमाळे आणि रविंद्र नरोटे यांचा समावेश होता.सदर कारवाईत गुटख्याच्या तस्करीसाठी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये अजय सिद्धार्थ खंडारे (वय २६), रा. भिमनगर, शिराजगाव, ता. खामगाव आणि विशाल संतोष कांबळे (वय २३), रा. चांदमारी फैल, खामगाव यांचा समावेश आहे.पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या गुटखा तस्करी प्रकरणी अधिक कारवाईची अपेक्षा आहे.