Headlines

बदनामीची धमकी देत खासगी रुग्णालयातील नर्सवर 23 वर्षीय तरुणाचा वारंवार अत्याचार, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा :- खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका ३२ वर्षीय नर्सवर २३ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची तक्रार पीडित नर्सने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. विशाल गजानन बोराडे रा. जुनागाव असे या वासनांध तरुणाचे नाव असून तोदेखील एका खाजगी रुग्णालयात ब्रदर्स म्हणून नोकरी करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत नर्स बुलडाणा शहरातीलच राहणारी आहे. पिडीत नर्स आणि आरोपी विशाल २०२० मध्ये शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. तिथेच दोघांची ओळख आणि त्यातून मैत्री निर्माण झाली. त्यानंतर दोघांचे ऐकमेकांच्या घरी येणे-जाणे देखील सुरू झाले. पुढील काळात विशालने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याचाच उपयोग करून विशाल तिला बदनामीची धमकी देऊ लागला, त्यामुळे पुन्हा वारंवार विशालने त्याची शारीरिक भूक भागवली. पिडीत नर्सच्या मुलांना जिवे मारून टाकीन, अशी धमकी देखील विशालने दिल्याचे पिडीत नर्सने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विशालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पिडीत नर्स ही अनुसूचित जातीची असल्याने यात अॅट्रॉसिटीचे गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *