मलकापूर– राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वाघुड पुलाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मथुराबाई गोपाळ हिंगणकर (वय ५०), रा. मौजे वाघुड या सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने घटनास्थळावर न थांबता तात्काळ पलायन केले. मलकापूर पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रस्ता ओलांडतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघूड येथील महिलेचा मृत्यू; हायवे क्र. 53 वरील घटना
