खामगाव : तालुक्यातील जनुना येथील शेत शिवारात एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सुधाकर गणपत मुन्हेकर (५८) रा. जनुना यांनी आज दुपारी शेत शिवारात झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. सदर इसमाने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही पुढील तपास सुरु आहे.