मलकापूर – लोणवडी फाट्यानजीक झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दि. ८ मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास घडला.
मृत युवकाचे नाव धीरज विष्णू सपकाळ (२४, रा. तालखेड, ता. मोताळा) असे आहे. पिंपळगाव देवी येथून मलकापूरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाची समोरासमोर दुसऱ्या चारचाकीशी जोरदार धडक झाली. त्यामुळे दोन्ही वाहनांचे चालक आणि एकूण पाच जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच हनुमान सेनेचे अध्यक्ष अमोल टप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मदतकार्य करत जखमींना तातडीने मलकापूरच्या रुग्णालयात दाखल केले. चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
लोणवडी फाट्यानजीक चारचाकींची समोरा – समोर धडक; एकाचा मृत्यू, चौघांची प्रकृती गंभीर
