Headlines

सख्ख्या मावश्याची सालीच्या अल्पवयीन मुलीवर वाईट नजर, रात्री झोपेत नको ते केलं, आरोपीला अटक!

मेरा बु.: घरात झोपेत असताना सख्ख्या मावशाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अशा मुलीच्या तक्रारीवरून ३२ वर्षीय आरोपी मावशाला अंढेरा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील घटनेची माहिती अशी की, आरोपी मुलीचे मावसा हे गेल्या २ दिवसापासून गावी आले होते. दरम्यान रात्री सर्वांनी सोबत जेवण केले आणि घरामध्ये एकमेकाच्या शेजारी झोपले होते. मात्र रात्री अंधाराचा गैरफायदा घेत मावशाने सालीची अल्पवयीन असलेली १२ वर्षाच्या मुलीजवळ जावून तिच्यावर बलात्कार केला. तेव्हा मुलीच्या

रडण्याचा आवाज आल्याने घरात झोपलेले सर्व जण उठले असता आरोपी हा लगेच त्याच्या जागेवर जावून झोपला परंतु मुलीने मावासाने केलेल्या कृत्याबद्दल सर्व घटना सांगण्यास सुरवात केली. त्यामुळे लगेच मुलीच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशनला जावून तक्रार दाखल केली. पोलीस स्टेशनला आलेली तक्रार व मुलीची हकीकत एकूण घेवून ठाणेदार विकास पाटील यांनी दुय्यम ठाणेदार जारवाल यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश केले. त्यामुळे दुय्यम ठाणेदार जारवाल यांनी आरोपी रामप्रसाद श्रावण अंभोरे वय ३२ वर्ष रा. चंदंजिरा जालना यांच्या विरूध्द कलम ६५(१) ६४ (२) (१) ६४ (२) (i) ७४, BNS बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!