मलकापूर: भारतीय जनता पक्षात सामील होण्यासाठी मलकापूरच्या तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. शहर उपाध्यक्ष डॉ. विजयजी डागा यांच्या प्रयत्नांतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. सुभाष तलरेजा, नरेंद्र कोलते, हरीश भावनांनी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, तर बूथ क्रमांक 176 चे अध्यक्ष व भाजपा प्रदेश निमंत्रित कार्यकारिणी सदस्य डॉ. योगेशजी पटणी यांच्या अथक प्रयत्नांमुळे शेकडो तरुणांनी पक्षात प्रवेश घेतला.
या नव्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये संजय गवई, राजेश अवसरमोल, सिद्धार्थ अवसरमोल, किरण अवसरमोल, शैलेंद्र इंगळे, सागर वाकोडे, अमोल अवसरमोल, संदेश वाकोडे, अमोल इंगळे, देवेश मेढे, राम डोंगरे, अशोक शिंदे, धनराज वाकोडे, आदित्य वाकोडे, विनोद अवसरमोल, सचिन अवसरमोल, आकाश वानखेडे, अमित तायडे, राहुल अवसरमोल, पवन अवसरमोल, विशाल ठाकरे, यश वाकोडे, रितिक अवसरमोल, रोहित अवसरमोल, प्रीतम अवसरमोल, दर्शन अवसरमोल, अजय अवसरमोल, राम झुझुरडे यांचा समावेश आहे.
भाजपाच्या ध्येयाशी प्रेरित होऊन आणि चेनूभाऊंच्या नेतृत्वाखाली कार्य करण्याचा संकल्प करत या तरुणांनी महाविजयाचा संकल्प घेतला आहे. या सामूहिक प्रवेश कार्यक्रमाला श्री चेनुभाऊ संचेती, श्री मोहनजी शर्मा, डॉ. योगेश पटणी, शंकरराव पाटील, मिलिंद भाऊ डवले, संतोषजी बोंबटकर, सुरेश भाऊ संचेती, विशाल मधवानी, निखिल मधवानी, बबलू बैरागी यांच्यासह भाजपाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामूहिक प्रवेशामुळे मलकापूरमध्ये भाजपाचे संघटन अधिक मजबूत झाले असून पक्षाला नवीन उर्जा आणि कार्यक्षमता मिळणार असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.