चिखली-मेहकर मार्गावर अपघात; अंत्यविधीसाठी निघालेल्या तरुणाचा मृत्यू!

चिखली :- चिखली-मेहकर मार्गावरील अंबाशी फाट्यावर रविवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी सुमारे दीड वाजता झालेल्या भीषण अपघातात २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत ही घटना घडली. मृत युवकाचे नाव राम सुरेश राठोड (रा. सावंतबारा देवरी, ता. सोयगाव, जि. संभाजीनगर) असे आहे. ते एमएच २० एचएम १३२९ क्रमांकाच्या दुचाकीवरून मांडवा येथे अंत्यविधी कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी अंबाशी फाट्यावर एमएच ३७ जी ४८३७ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेचा जोर इतका प्रचंड होता की राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, मृतदेह चिखली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.
या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!