मलकापूर :- येथील नूतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या शासकीय रेखा कला परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या यशात भर घातली आहे. या परीक्षेत शाळेचा १०० टक्के निकाल लागला असून, एलिमेंटरी व इंटरमिजिएट स्तरावरील विद्यार्थ्यांनी A व B ग्रेड प्राप्त करत आपली कला-कौशल्ये सिद्ध केली आहेत.
कला क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीमुळे नूतन इंग्लिश स्कूलचा नावलौकिक वाढला असून, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळालेली ही पावती निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उत्तुंग यशामागे शाळेचे प्राचार्य श्री. सुरेश खर्चे सर, उपप्राचार्य श्री. प्रदीप कोलते सर, अमोल चोपडे सर तसेच कलाशिक्षक श्री. ऋषिकेश बाळापूरे सर यांचे मार्गदर्शन आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी घेतलेले सातत्यपूर्ण परिश्रम या यशातून अधोरेखित झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग व पालकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
नूतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची रेखा कला परीक्षेत चमकदार कामगिरी
