Headlines

२४ तासांत पोलिसांची चपळ कारवाई; फरार आरोपीसह ३.०५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

खामगाव : शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तत्परता दाखवत अवघ्या २४ तासांत फरार आरोपीला अटक करून चोरीतील सुमारे ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत प्रदीपराव देशमुख (वय ३२, रा. खामगाव) यांनी १ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकीच्या हॉटेल व लॉजिंगमध्ये आरोपी सुनील विश्वनाथ नेमाणे (वय ३०, रा. अमृतनगर, सजनपुरी, खामगाव) याने नोकरीच्या बहाण्याने प्रवेश मिळवला. त्यानंतर काउंटरमधून रोकड व इतर साहित्य चोरून तो पसार झाला होता. या चोरीमध्ये २० हजार रुपये रोकड, एचपी कंपनीचा लॅपटॉप (किंमत सुमारे ३५ हजार रुपये) तसेच एमएच १२ टीडी ५२९५ क्रमांकाची कार (किंमत सुमारे २ लाख ५० हजार रुपये) असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास सुरू असताना डीबी पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या सहाय्याने सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई एपीआय पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संदीप टाकसाळ, पोकाँ. केशव झाटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी बोर्डे, पोलीस कॉन्स्टेबल राजू कोल्हे, चालक पीसी विशाल सोनवणे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे राजू आडवे व कैलास ठोंबरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!