मलकापूर :- उमाळी येथील प्रल्हाद शिवाजी राउत (वय ४०) यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज घडली असून मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद राउत यांना त्यांचे मामेभाऊ विजय अवधूत बगाळे (वय ४८) यांनी उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती डॉ. एन. क्षिरसागर यांच्या वतीने कक्षसेविका तस्लीम शेख यांनी पोलिसांना दिली. घटनेची नोंद अकस्मात मृत्यू अंतर्गत मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास बाळू टाकरखेडे करीत आहेत. मृत्यूचे कारण समजण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार असून, अहवाल आल्यानंतर पुढील तपासाचा दिशा निश्चित होईल.