मलकापूर :- नुकत्याच झालेल्या NEET परीक्षा निकाला संदर्भात झालेल्या गोंधळाबाबत व विद्यार्थ्यावर झालेल्या अन्यायाबाबत सौ.कोमलताई तायडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांना आज दी.12 जुन रोजी निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या “नीट” परिक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याची बातमी विविध प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यामधुन वाचण्यात आली. यावर्षी लागलेल्या निकालात काही अनपेक्षीत बाबी लक्षात आलेल्या असुन परिक्षेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पालगवर्ग करत आहे. तसेच परिक्षेपुर्वीच पेपर लीक झाल्याचे सुध्दा बातम्या प्रसारीत झाल्या आहेत. परिक्षेचे स्वरुप अत्यंत कठीण असुनसुध्दा यावर्षी खुप (67) विद्यार्थीना 720 पैकी 720 गुण मिळाल्याचे निदर्शनास आलेले आहेत व हरियानामधील एकाच केंद्रावर 8 विद्यार्थीना पैकी च्या पैकी गुण मिळालेले आहे. अनेकांच्या मते हे शक्य नसल्याचे बोलल्या जात आहे. तरी पालक व विद्यार्थीचा रोष लक्षात घेता यावर्षीच्या NEET परिक्षेची CBI मार्फत चौकशी होऊन कोणी दोषी असल्यास कठोर कार्यवाही करावी यासाठी हे निवेदन संबंधीतांना वर्ग करावे ही विनंती करण्यात येत आहे.
तरी प्रशासनाने चौकशी करुन दखल न घेतल्यास विद्यार्थ्यांच्या समवेत पुर्वकल्पना देऊन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. यावेळी कोमलताई तायडे, प्रा.अमोल पाटील सर, प्रा.मोरे सर, शुभमभाऊ लाहुळकर, मंगेश धोरण, शिवाजी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती व विध्यार्थी,पालक बहुसंख्यानी उपस्थित होते…