नांदुरा :- शहरात वीज वितरण कंपनीच्या बुलढाणा येथील भरारी पथकाने वीज चोरी करणाऱ्या तिघा ग्राहकांवर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तीन लाख ४२ हजार ८४० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.११ डिसेंबर रोजी झालेल्या या कारवाईत तुळशीराम बाबूसा बासोडे यांना ३,२९९ युनिट वीजचोरीबद्दल ८४,१०० रुपये दंड करण्यात आला. काशिनाथ श्यामराव तायडे यांना ५,०२१ युनिट वीज चोरीबद्दल १,२१,८९० रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर रामभाऊ एन. कोलते यांना ४,८४२ युनिट वीज चोरीबद्दल १,३६,८५० रुपये दंड ठोठावण्यात आला.
ही कारवाई वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने केली असून, वीज चोरीस आळा घालण्यासाठी असे कठोर पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीने सर्व नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.