Headlines

नांदुरा जवळ 30 प्रवासी असलेल्या धावत्या खासगी बसला आग! प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाश्यांचा जीव

 

नांदुरा :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर इंदोरहून अकोलाकडे जात असलेल्या एका धावत्या खासगी बसला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी नांदुरा परिसरात घडली. चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ३० प्रवाशांना वेळीच खाली उतरवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. माहितीनुसार, NL 07 B 0694 क्रमांकाची खासगी बस इंदोरहून अकोलाकडे प्रवास करत होती. नांदुरा जवळ येताच बसमधून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच धूर वाढत आगीने भीषण रूप धारण केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चालक व वाहकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नांदुरा येथील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेमुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!