नांदुरा : – 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “हॅपी रिव्हर कॉम्युनिटी मिशन” च्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबवित नांदुरा तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राहावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून “हॅपी रिव्हर कॉम्युनिटी मिशन” च्या सदस्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिन म्हटला की पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचा वाटा येतो तो झाडांचा तर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेगवेगळ्या भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात येत असते. याच धरतीवर “हॅपी रिव्हर कॉम्युनिटी मिशन” च्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विशेष करून पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी 100% ऑक्सिजन देणारी वड, पिंपळ, शिसम, बदाम, कडुलिंब यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी “हॅपी रिव्हर कॉम्युनिटी मिशन” nचे सर्व सदस्य परिवारासहित उपस्थित होते. वृक्षारोपण म्हटले की झाडांची रोपटी, खड्डे, तयार करण्यासाठी फावडे, कुदळ या सर्व गोष्टींनी सुसज्ज टीम अशाप्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली होती. सर्वप्रथम सकाळी 11 वाजता झाडांची रोपटी आणून आणि त्यासाठी योग्य प्रकारे खड्डे तयार करण्यात आले. या सर्व वृक्षारोपणसाठी नांदुरा तहसील कार्याल तहसीलदार माननीय वट्टे तसेच तहसील कर्मचा… यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी “हॅपी रिव्हर कॉम्युनिटी मिशन” चे सदस्य कपिल वाकोडे, शुभांगी वाकोडे, दिनेश नरवाडे, नलिनी नरवाडे, उज्वल पहुरकर, अनुराधा पहूरकर, आम्रपाली पहुरकर, मंगेश पांडव, सुनील हेलोडे, वंदना हेलोडे, सरिता पारखे, रिता राजपूत, अश्विनी आगरकर यांच्यासह सर्वांची उल्लेखनीय उपस्थिती होती. या अभिनव उपक्रमामुळे “हॅपी रिव्हर कॉम्युनिटी मिशन” चे सर्वत्र कौतुक होत आहे.